मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले चौकशी चे आदेश; सामाजिक कार्यकर्ते शेख बक्शू यांच्या तक्रारीची दखल
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
सध्या सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अशा या घूसखोरांवर लगाम कसण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एण्टी करप्शन ब्यूरो) ही स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. मात्र बीड येथील एसीबीचे अधिकारी लाखो रूपयाचा मासिक हप्ता वसुल करतात असा खळबळजनक आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. शेख बक्शू अमीर यांनी विभागवार रेटकार्डसह मुख्यमंत्री कार्यालयाकडे केला आहे. या दाखल तक्रारीची गंभीर दखल घेत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारीची शहानिशा करण्याचे आदेश दिले आहे.

बीड जिल्ह्यात गुटखा तस्करी, वाळू तस्करीत संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी सर्रास हप्ता वसुली करता असे आरोप केले जातात. या संदर्भात खाजगीत रेटकार्ड विषयी आपण ऐकतोत. पैसे देणारे व घेणारे ही आपले काम सोपासकार पार पाडित असतात. मात्र आता या घूसखोरांवर लगाम कसणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एण्टी करप्शन ब्यूरो) ब्यूरो चे तत्कालीन उपाधिक्षक व सध्या कार्यरत असलेले पुलिस निरीक्षक यांच्याकडून मासिक 24 लाख रूपए हप्ता वसुलीचा दावा सामाजिक कार्यकर्ते अॅड. शेख बक्शू अमीर यांनी मु्ख्यमंत्री कार्यालयात दिलेल्या तक्रारीत केली असून या तक्रारीत दोन्ही अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे.
एवढेच नव्हे तर बीड एसीबी ने गेल्या कांही वर्षात जिल्ह्यात कारवाई न करण्यासाठी वसुली केल्याचा दावा ही अॅड बक्शु यांनी केला आहे. जिल्ह्यात एसीबी कडून महिण्याकाठी तब्बल 24 लाखांची वसुली करण्यात येत असून यात तत्कालीन उपाधीक्षक बाळकृष्ण हनपुडे आणि सध्या पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रर्वीद्र परदेशी यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.
दोन्हीं अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी
तक्रारदार शेख बक्शु अमीर यांनी आपल तक्रारीत दोन्ही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा उल्लेख केलेला असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे.
आरटीओंवर नाही एकही कारवाई
बीड जिल्हात 1980 पासून बीडच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात एकदाही एसीबीच्या छापा किंवा सापळा झालेला नाही असा दावा देखील करण्यात आला आहे. यातूनच एसीबीचे या कार्यालयाशी लागेबांधे असल्याचे समोर घेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दाखल तक्रार बेदखल
अॅड. शेख बक्शू अमीर यांनी तक्रारीत म्हटले आहे की आरटीओ कार्यालयात लाच मागितली जात असल्याची तक्रार सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती. त्यानुसार लाचेची मागणी नोंदविण्यात देखील आली रेकार्ड वर ती नोंद झाली, मात्र नंतर त्या व्यक्तीला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. मात्र संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध लाचेची मागणी केल्याचा गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाहीं असेही तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीतील दाव्यानुसार विभागवार हप्ता वसुलीचा आकडा
महसूल विभाग बीड : 1 लाख 50 हजार
आरटीओ बीड :1 लाख 70 हजार
आरटीओ अंबाजोगाई :1 लाख 40 हजार
सा.बां. विभाग बीड : 1लाख 80 हजार
सा.बां. विभाग अंबाजोगाई : 1 लाख 40 हजार
दुय्यम निबंधक बीड :1 लाख 80 हजार
राज्य उत्पादन शुल्क :1 लाख 60 हजार
महामार्ग पोलीस पाडळसिंगी : 40 हजार
महामार्ग पोलीस मांजरसुंभा : 35 हजार
एलसीबी : 75 हजार
बीड जिल्हा पुरवठा विभाग : 1 लाख 30 हजार
फॉरेस्ट विभाग : 90 हजार
अन्न भेसळ विभाग : 45 हजार
जिल्हा परिषद बीड : 50 हजार
जिल्हा वाहतूक शाखा : 90 हजार
एसपी विशेष पथक : 60 हजार
एडीएस : 40 हजार
सर्व पोलीस ठाणे : 3 लाख 55 हजार
जिल्हा आरोग्य अधिकारी : 1 लाख 70 हजार
समाज कल्याण विभाग : 50 हजार
भूमी अभिलेख विभाग : 50 हजार
पाठपुरावा सुरूच ठेवणार

लाचखोरांवर नियंत्रण ठेवणाऱ्या एसीबी विभागात सुरू असलेल्या गैर प्रकाराबद्दल मी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही तक्रारी दिल्या आहेत. ज्या कार्यालयाने लाच रोखायची तेच कार्यालय असे बरबटले तर कसे चालणार. मी या प्रकरणाचा अखेरपर्यंत पाठपुरावा करणार. कार्यालय बरटले तर कसे होणार.
बक्शु अमीर शेख,
सामाजिक कार्यकर्ते, बीड