By MahaTimes ऑनलाइन – बीड |
कोणताही उद्योग धाडसाने सुरू केला तर तो निश्चितच यशस्वी होतो. ग्रामीण भागात छोटे-छोटे उद्योग उभारले गेले तर रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. बीड जिल्हा उद्योग क्षेत्रातही भरारी घेत आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे रविवारी सार्थक ग्राऊंडनट इंडस्ट्रीचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज मनेश्वर संस्थान तळेवाडी, ह.भ.प.राम महाराज श्री क्षेत्र संस्थान पाडळसिंगी, बीड न.प.चे बांधकाम समिती सभापती विनोद मुळूक, विलास विधाते, किशोर पिंगळे, राम मोहळकर, मगनराव चव्हाण, बळीराम नन्नवरे, संजय गव्हाणे, मुख्याध्यापक थिटे ए.एस., प्रा.दिपक लाटे, विकास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, शेंगावर प्रक्रिया करणारी कारखानदारी आली तर अनेक उद्योजक तयार होतील. रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो, पाण्याच्या मुबलक साठ्यामुळे शेतकरी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. आपला ऊस कारखान्याला जावा, चांगला भाव मिळावा त्या दृष्टीने कारखानदारी आवश्यक आहे. जेंव्हा संधी मिळते किंवा पद मिळते तेंव्हा ज्याचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न केला. सोलापूर-औरंगाबाद या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी मागील काळात प्रयत्न केले. या रस्त्याचे काम दर्जेदारपणे झाले.
सर्व क्षेत्रामध्ये प्रक्रिया गतीमान होत आहे. कापसापासून सुत तयार करतोत तसं रेशम कोषापासून रेशम तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच ह.भ.प. राम महाराज यांचे आशिर्वादपर भाषण झाले. याप्रसंगी विनायक नन्नवरे, माणिकराव नन्नवरे, बाबूराव नन्नवरे, अंकुश नन्नवरे, नितीन नन्नवरे, सचिन नन्नवरे, अंजित नन्नवरे, महादेव काळे, लहू नन्न्वरे यांच्यासह गावातील व परिसरातील नागरीकांची उपस्थिती होती.