शिवसेना नेते काय म्हणाले वाचा…
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी रविवारी बीड नगर पालिका इमारतीवर उर्दू भाषेत बोर्ड लावला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. उर्दू भाषाप्रेमींनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. मात्र यास एक वर्ग विरोध करीत आहे. यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मराठी भाषेतील नाव ठळक अक्षरात व दर्शनी भागात असावे मात्र इतर कोणत्याही भाषेत बोर्ड त्यापेक्षा लहान अक्षरात असल्यास कांहीच हरकत नाहीं असे स्पष्ट करीत सुरू असलेल्या वादावर पडदा पडला.
नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी नागरीकांची मागणी लक्षात घेता नगर पालिका इमारतीवर उर्दू भाषेत बोर्ड लावण्याचे आश्वासन दिले होते. काल रविवारी (दि. 16) रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. आपल्या पंचवार्षिक कार्यकाळाच्या शेवटचा दिवस गोड करत डॉ. क्षीरसागर पालिकेत ठराव घेत बीड नगर पालिकेचा बोर्ड उर्दू भाषेत लावला. या निर्णयास विरोध होत आहे.
शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे नगर पंचायत निवडणूक प्रचार अनुषंगाने काल बीड जिल्हा दौºयावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले की, एकी कडे राज्यात मराठी नावांच्या पाटयासाठी शिवसेना आक्रमक झाली असतानाच मात्र बीडमध्ये उर्दू भाषेत बोर्ड लावुन शिवसेनेच्या अवाहनाला खो देण्यात आला आहे. याबाबत विचारणा केली असता, खैरे ते म्हणाले या विषयी मला अधिक माहिती नाहीये. मात्र ठराव असा झालेला आहे पाट्या मराठीत मोठ्या अक्षरांमध्ये असायला पाहिजेत आणि इतर भाषेमध्ये नाव हे त्या ठिकाणी छोट्या आकाराचे लावण्याचे आदेश या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत.
काय आहे सरकारचा निर्णय ?
राज्य सरकारने राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा आदेश दिला आहे. मात्र या आदेशात नामफलक मराठीत भाषेत असावा इतकाच उल्लेख नाही तर याशिवाय अनेक महत्वाच्या अटींचा उल्लेख आहे. यातून पळवाट काढता येऊ नये म्हणून सरकारने अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असं आदेशात स्पष्ट सांगण्यात आलं आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीची दुरुस्ती मंजूर करण्यात आली. त्यामुळे इंग्रजी किंवा इतर भाषेत मोठं नाव आणि कोपऱ्यात छोट्या आकारात मराठी नाव असं चालणार नाही.