आ.संदीप क्षीरसागर कडून मतदारसंघात आश्वासनाची पूर्तता ; जनतेचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी प्रेरणा देतात
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
मागील अनेक वर्षापासून बीड शहराचा विकास हा फक्त कागदोपत्री होत होता. निवडणुकीत तुम्ही मला आशिर्वाद दिले. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता आता मतदारसंघात करत आहे. तुमचे आशिर्वाद विकास कामे करण्यासाठी मला प्रेरणा देत असल्याचे सांगत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील विविध ठिकाणी 2 कोटी 10 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले.
बीड शहरातील प्रभाग क्र.2 मधील सिमेंट काँक्रेट रस्ता, नाली बांधकाम याच वार्डातील अन्य दोन ठिकाणी सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम त्याचबरोबर प्रभाग क्र.6, प्रभाग क्र.7,8 मधील सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचा शुभारंभ आज सकाळी आ.संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्याचे अल्पसंख्यांक निरीक्षक सलीम सारंग यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
बीड शहरातील प्रभाग क्रमांक 02 मध्ये संजय पाटील ते हरीश कुकडेजा यांचे घर व नंदकिशोर आणेराव ते बबन राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 58 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 02 मध्ये गणेश बागडे ते डॉक्टर पी.के.कुलकर्णी यांचे घर, राजू गोरे ते समेल अशोक यांचे घर व वर्धमान देवघरे ते मिथुन नगरे यांच्या घरापर्यंत सह्योग्नगर भाग सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 28 लक्ष 11 हजार रुपये, प्रभाग क्रमांक 02 मध्ये नितीन सवई ते सत्यनारायण कासार यांचे घर व प्रदीप रोड ते सुरेश नवले यांच्या घरापर्यंत (सह्योगनगर भाग) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 35 लक्ष 50 हजार रुपये, प्रभाग क्रमांक 02 मधील उन्हाळे हॉस्पिटलमागील बाजू ते फुलाई नगरपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 20 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 06 मधील नवनाथ खंडागळे ते हुसेन बागवान व जुबेर खान ते सय्यद सलीम व बुराण खान ते ऍड. मिर्झा बेग यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे 25 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 07 मधील गजानन दोडके ते अब्दुल गणी इनामदार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 15 लक्ष रुपये, प्रभाग क्रमांक 08 मधील शेख परवेज ते निसार अन्सारी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे 25 लक्ष रुपयांचा सोमवार दि.17 जानेवारी 2021 रोजी आ.संदिप क्षीरसागर यांच्या हस्ते तर माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे अल्पसंख्यांकांचे राज्याचे निरीक्षक सलीम सारंग यांच्या उपस्थितीत करण्यात आला.