नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर कडून आश्वासनाची पूर्तता ; उर्दू भाषाप्रेमींनी केले स्वागत
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड नगर परिषदेच्या इमारतीवर उर्दु भाषेतील बोर्ड लावावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. रविवारी नगर परिषदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी वचनपूर्ती करत नगरपालिकेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील बोर्ड लावला. उर्दू भाषाप्रेमींनी फटाक्याची आतिषबाजी करीत नगराध्यक्षांचे स्वागत केले.

बीड नगरपालिकेची टोलेजंग इमारत बांधून पुर्ण झाली. या इमारतीवर उर्दू भाषेतील बोर्ड लावावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून होत होती. या मागणीसाठी नगर परिषद परिसरात अनेक वेळा आंदोलनेही झाली. परंतू उर्दू भाषेतील बोर्ड लावण्यास काही वेळा विरोधही झाला. या सर्व परिस्थितीमुळे नगर परिषदेच्या इमारती वर उर्दू भाषेतील बोर्ड लागलाच नव्हता.
गत नगर परिषद निवडणुकीमध्ये उर्दु भाषेतील बोर्ड लावण्या संदर्भात आश्वासने दिली गेली होती. या आश्वासनाची पुर्तता रविवारी झाली असे म्हणावे लागेल. नगरपालिकेचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवारी संपला असून सोमवार पासुन पालिकेची सूत्रे प्रशासकाच्या ताब्यात जाणार आहे. नगर परिषद प्रशासकाच्या हातात जाण्यापूर्वीच नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी अधिकृतपणे नगर परिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील बोर्ड लावला.
नगराध्यक्षांच्या या भूमिकेचे बशीरगंज चौकामध्ये फटाके वाजवून आणि नगराध्यक्षांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी नगरसेवक मुखीद लाला, शेख एकबाल, जलील खान, जमील मामू, मोमीन सद्दाम, बाबा खान, फय्याज कुरेशी, सुलतान बाबा, आयुब खान, आब्दल शाफे, सिराज आरजू आदि उपस्थित होते.