नगराध्यक्ष डॉ. भारत भुषण क्षीरसागर यांची पत्रकार परिषद
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच भेदभाव केला नाही आणि करणार नाही. माझे वर्ष साठ वर्ष आहे मात्र, मी आतापर्यंत आमदार करा असे म्हणालो नाही. त्यांनी (पुतणे आमदार संदीप क्षीरसागर) यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गँग सक्रीय असल्याचा घणाघाती आरोप बीड चे नगराध्यक्ष डॉ. भारत भुषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

शुक्रवारी सायंकाळी नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांनी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत म्हणाले की, बीड शहरात 88 कोटींची रस्ते पूर्ण झाले आहेत. शहरातील आणखी 15 नवीन रस्त्यांचे प्रस्ताव दाखल कंरण्यात आले असून लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. जर रस्त्याच्या कामात कुठे चुका दिसुन आल्या तर त्या आमच्या निदर्शनास आणु द्या. आम्ही तातडीने दुरूस्ती करू मागील डिपीआर मध्ये शहरातील नगरोत्थान महाअभियानात राज्य स्तरावर पहिला 88 कोटी रूपये खर्च करून 16 रस्त्याची कामे मंजूर करून पूर्ण केली असुन या कामामुळे बीड शहराचे सौंदर्य वाढले असुन नागरिकांचा बीड नगर पालिकेवरील विश्वास वाढला आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच भेदभाव केला नाही आणि करणार नाही. विरोधकांच्या वार्डाचाही आम्ही विकास केला भेदभाव केला नाही. विकासात कधीच राजकारण आडवे आणले नाही.
शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोण व का करीत आहेत हे सर्व जण जाणून आहेत. मी 88 कोटी आणले तर तुम्ही 100 कोटी आणा. राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात खोडा घालणारी नसावी असे म्हणत यांनी पुतण्या (संदीप क्षीरसागर) यांना एक प्रकारे आव्हान दिले.
बीड नगरपालिकेतील विकास कामात त्यांनी खोडा घातल्याचा आरोप ही डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला. त्यांनी पुतण्याने आतापर्यंत केलेल्या कारणाम्याचा पाढा वाचला. या पत्रकार परिषदेस बांधकाम सभापती विनोद मुळूक, डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेवक गणेश वाघमारे, गणेश तांदळे आदी उपस्थीत होते.