मिस इंडिया युनिव्हर्स चे स्वप्न उराशी बाळगून, कृषि कन्या प्रतिभा सांगळेचं सर्वत्र कौतुक
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड पुलिस दलात पुलिस अंमलदार म्हणून कार्यरत कृषि कन्या प्रतिभा सांगळे प्रतिकूल परिस्थितीत राज्य स्तरावर सौंदर्यवतीसाठी असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याची केवळ ईच्छाच पूर्ण केली नाही तर ‘मिस महाराष्ट्र’ हा बहुमानाचा खिताब पटकावित प्रकाश झोतात आली आहे. आता प्रतिभा मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून असून त्या दृष्टीने तिचे प्रयत्व सुरू आहेत.
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत वर्ष 2010 पासून त्या पोलीस दलात कार्यरत आहेत. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. त्या आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बराच प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अपचा किताब पटकावत मिस महाराष्ट्र स्पर्धेपर्यंत आणि तिथून पुढे थेट जेतेपदापर्यंत मजल मारली आहे.
‘प्रतिभा’चं Live Video >> Watch Now
पोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिलाय. या यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होतंय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणार्या प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही चांगल्या प्रकारे गाजवले आहे. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवलीय.
‘प्रतिभा’चे कांही खास फोटो >> View Now
‘‘माझे आजोबा कुस्तीपटू होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत मी कुस्तीच्या रिंगणात उतरले. मी पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून जॉइन झाले. लहानपणी शाळा, गॅदरींगमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे तेव्हाचे जे छंद होते ते आता जोपासले पाहिजे असं वाटलं. त्यातूनच सौंदर्य स्पर्धेकडे मी वळले,’’ असं प्रतिभा यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे. मी पालकांना आवाहन करु इिच्छते की मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करु नका,’’ असंही त्या म्हणाल्या. तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.