जिल्हाभरात कार्यक्रम, ठिक ठिकाणी अभिवादन
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
हिंदवी स्वराज्य राजमाता जिजाऊ यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिल्हाभरात ठिकठिकाणी जिजाऊंची प्रतिमा व पुतळ्यालाअभिवादन करण्यात आले. याशिवाय सर्व सरकारी, निम सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय व संस्था, वाचनालयात जयंती साजरी करण्यात आली.

बीड शहरातील मांसाहेब जिजाउ चौक येथील शिवप्रेमींचा मेळा भरला होता. यावेळी जय जिजाउ जय शिवरायच्या घोषणांनी परीसर दणाणला. याप्रसंगी डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर सहित जिजाउ व शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
मिस महाराष्ट्र प्रतिभा सांगळेंचा भाजपा तर्फे सत्कार
संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यातआली.
जयंतीचे औचित्य साधून गुणवंत व प्रतिभावान मिस महाराष्ट्र प्रतिभा सांगळेंचा बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालयात सत्कार करून कौतुक करण्यात आले.

मिस महाराष्ट्र प्रतिभा सांगळेंचा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते सत्कार करून कौतुक करण्यात आले.
यावेळी एड.सर्जेरावतात्या तांदळे, राजेंद्र बांगर, प्रा.राजेश भुसारी ,शांतीनाथ डोरले, अजय सवाई,किरणआबा बांगर, सोमनाथराव माने पाटील,अनिल चांदणे, प्रमोद रामदासी, संग्राम बांगर, किरण देशपांडे,महादेव मुंडे, संभाजी सुर्वे,मनोज ठाणगे,संध्या राजपूत,शितल राजपुत, रामदुलारी राजपूत,प्रित कुकडेचा, मारूतीराव तिपाले,बामणे विलास, नागेश पवार,किरण देशपांडे,
बाबुलाल ढोरमारे, सुरेश माने, शंकर तुपे, शफीक काझी, रमेश वाघमारे, उध्दव आरे, सचिन आगाम, बद्रीनाथ जटाळ, आबा येळवे,शफिक काझी, अनिल शेळके,आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तर्फे अभिवादन

राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजामाता यांना जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना नेहाताई क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या दिसत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करु न अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी भारती सागरे, नायब तहसीलदार धर्माधिकारी, महादेव चौरे, मयुरी नवले, रेखा घोडके, शुभम माडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करु न अभिवादन केले.
बालेपीर वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात

येथील बालेपीर सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद प्रतिमेस पुष्पहार अर्पण करु न अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रथम मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष बहादूर खान पठाण यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच यावेळी उपस्थित अशोक दामकर, विठ्ठल जाधव, अर्जुन कांबळे, अशोक काशीद, शिंदे सर, शेळके सर तसेच शाळेतील विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन अर्जुन कांबळे यांनी मानले.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त डॉ.सारिका क्षीरसागर यांनी चित्रकला स्पर्धा व चंद्रकोर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा ही 1 ली ते 4 थी गट, 5 वी ते 10 वी गट व महाविद्यालयीन गटासह इतरांसाठी होती. तर चंद्रकोर स्पर्धा ही खुल्या गटासाठी होती. चित्रकलेसाठी गडिकल्ले हा विषय देण्यात आला होता तर चंद्रकोर साठी वेशभुषा करु न स्वत: रेखाटलेला चंद्रकोर हा विषय होता. सदरील स्पर्धेत चित्रकलेसाठी 285 स्पर्धकांनी तर चंद्रकोर 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. याचा बिक्षस वितरण सभारंभ के.एस.के.महाविद्यालय येथे माजी नगराध्यक्षा तथा प्राचार्या डॉ.दिपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शुभम कातांगळे, महेश धांडे, रवीराज जेधे यांच्यासह स्पर्धक व त्यांच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.