By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील अंजुमन इशात-ए -तालीम संस्थेचे संस्थापक स्व. अहमदबीन अबुद चाऊस यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सोमवारी सकाळी 11 वाजता मिल्लीया महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलियास फाजील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ. हुसेनी, डॉ. विष्णू सोनवणे, डॉ. संध्या बिडकर, डॉ. फारूकी, मोहम्मद खय्युम आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात अनेकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. या शिबिरासाठी जिल्हा रूग्णालय बीड येथील डॉक्टर रेश्मा गवते, पी.आर.ओ. श्रीमती आशा कोकान, सहाय्यक शेख रियाज, श्री.नरसिंग कोंकाडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.