नाईट कर्फ्यू ; बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी.
अंशतः सुधारित आदेश ; सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी
By MahaTimes ऑनलाइन वृत्तसेवा | बीड
मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. बीडमध्ये बाधित रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. हे निर्बंध आणि नियम 10 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यात वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी राज्य सरकारने सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देत सुधारित आदेश जारी केले आहेत.
असे आहेत निर्बंध आणि नियमावली
पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी.
या बाबी वगळता शाळा आणि कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद
आता शाळा, कॉलेज आणि क्लासेसवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संदर्भात बोर्डाच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाहीसाठी परवानगी दिली जाईल. शाळेत शिकवण्याबरोबरच प्रशासकीय कामे शिक्षकांनीच करावीत
शासकीय कार्यालये
- महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी.
- कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी.
- बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था
- कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील.
- कार्यालय प्रमुखांनी कोविड नियमाचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी.
- कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.
खासगी कार्यालये
- कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा.
कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील.
- लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे.
- कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी.
- कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.
लग्नात 50 लोक, अंत्यसंस्कारात 20 लोक
या आदेशानुसार, विवाह सोहळ्यात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्काराला केवळ 20 लोकच उपस्थित राहू शकतील. सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही केवळ 50 लोकांमध्येच घेता येणार आहेत
हेअर कटींग सलून
- 50 टक्के क्षमता
- रोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
- एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील.
- हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी
रात्रीचे हॉटेल, थिएटर बंद राहनार
एन्टरटेनमेंट पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्तूसंग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे/नागरीकांसाठीचे कार्यक्रम बंद राहतील
शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्सेसमध्ये बंधनांसह प्रवेश
- 50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.
- सर्व आगंतुक आणि कर्मचारी कोव्हिडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील, याची दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शल्स नेमावेत.
- आरएटी चाचणीसाठी बूथ/किऑस्क
- फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल
- दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
रेस्टॉरंट्स, उपाहारगृहे
- 50 टक्के क्षमता.
- सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.
- फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल
- दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
- दररोज होम डिलीव्हरीला परवानगी राहील.
नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स
- 50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक.
- फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल
- दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
राज्य सरकारचा सुधारित आदेश जारी
राज्य सरकारने सलून सुरू ठेवण्यास परवानगी
देत ब्यूटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे राज्य सरकारचा आदेश होता. राज्य सरकारच्या या निर्णयावर राज्यात वाद निर्माण झाला असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया येत होत्या. शेवटी राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत.
या नव्या सुधारित आदेशानुसार राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारने म्हंटलं आहे की, ‘ब्युटी पार्लरचा देखील
हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे.
यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50
टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये
तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच
गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे
काम करणार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच
येथे प्रवेश असेल’, असेही राज्य सरकारचा आदेश आहेत.