अंबाजोगाई-लातूर रोड बस व ट्रक ची समोरासमोर धडक ; 15 गंभीर जखमी, जखमींवर स्वारातीत उपचार सुरू
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
अंबाजोगाई -लातूर रोडवरील बर्दापूर नजीक एसटी बस व ट्रक चा समोरासमोर भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 15 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले.

माहिती अशी की, लातूर- औरंगाबाद ही बस प्रवासी घेऊन अंबाजोगाई कडे येत होती तर ट्रक अंबाजोगाई हुन लातूरकडे जात होता. लातुर बस ( क्र . एम.एच . 20 बी.एल 3010 ) आणि ट्रक ( क्र . के. ए . 05. ई 5494 ) या दोन्ही वाहणांची बर्दापुर पासुन जेमतेम दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या दुध डेअरी समोर जोराची धडक झाली.
या अपघाताची माहिती मिळतात बर्दापुर पोलिस, ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अपघात एवढा भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्र ेन ची मदत घ्यावी लागली.
अपघातात चौघांचा मृत्यु: 15 जखमी
या अपघातात आदिल सलीम शेख ( रा. अंबाजोगाई ) , महिला वाहक चंद्रकला मधुकर पाटील ( वाहक रा . कांचनवाडी , औरंगाबाद ) , नलीनी मुकुंदराव देशमुख ( रा.ज्योतीनगर , औरंगाबाद ) आणि सादेक पटेल ( रा.राडीनगर , लातुर ) या चौघांचा मृत्यू झाला आहे .तर सुंदरराव ज्ञानोबा थोरात ( रा . पांगरी ता.धारूर ), हरिनाथ रघुनाथ चव्हाण ( रा.लातूर ), अलाउद्दीन आमिरपठाण ( रा.निलंगा ), अजमत तालीब पठाण ( रा.लातूर ), जियान फईम पठाण ( ग.लातूर ), भागवत निवृत्ती कांबळे ( रा.लातूर ), योगीता भगवंत कदम ( रा.लातूर ), दस्तगीर अय्युब पठाण ( रा . निलंगा ), प्रशांत जनार्धन ठाकुर ( रा , शेंडी ), सुभाष भगवान गायकवाड ( रा . पिंपळगाव ), आयान फईम पठाण ( रा . लातुर ), माधन नरसिंगराव पठारे ( रा.जालना ), बळीराम संभाजी कराड ( रा . खोडवा सावरगाव ) यांच्यासह अन्य दोन असे 15 जण जखमी झाले आहेत .