पत्रकारांकडून अपेक्षा करताना, समाजाने जाणीवही ठेवावी-वसंत मुंडे
दर्पणकार पुरस्कार गुलाब भावसार यांना तर प्रतापराव सासवडेंना आदर्श वृत्तपत्र विक्रेते पुरस्कार प्रदान
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
पत्रकार हे समाजाची नाडी असतात. तर राजकीय नेतृत्व समाजाच्या प्रगतीचे हृदय असतात. लोकशाही टिकवायची असेल तर या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली माणसं भविष्यात उभी राहणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार उषाताई दराडे यांनी केले. तर पत्रकारांकडून निर्भिड, निःपक्ष पणाच्या अपेक्षा व्यक्त करताना अडचणीच्या वेळी समाजानेही पत्रकारांची जाणीवही ठेवावी. पत्रकारांनाही कौटुंबिक जबाबदार्या असतात. वृत्तपत्र टिकले तरच लोकशाही मजबूत राहील यासाठी वृत्तपत्रांनीही पारंपारीक आर्थिक धोरण बदलावे असे स्पष्ट मत पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले. पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पण दिन सोहळा दर्पणकार पुरस्कार ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार तर अब्दुल कलाम आदर्श वृत्तपत्र विक्रेते पुरस्कार प्रतापराव सासवडे यांना मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करुन प्रदान करण्यात आला.
बीड येथील स. मा. गर्गे भवन येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी दर्पण दिनाचे औचित्य साधून दर्पण दिन सोहळा गुरुवार दि. 6 जानेवारी रोजी संपन्न झाला. सकाळी 10 वाजता या सोहळ्याला प्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांच्या सुमधूर बासरी वादनाने सुरुवात झाली. तब्बल एक तास बासरीचे विविध सुर उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन गेले. यानंतर दर्पण दिनानिमित्त आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि ज्येष्ठ पत्रकार स्व.स.मा.गर्गे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दर्पणकार पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे लाभले
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार उषाताई दराडे यांची विशेष उपस्थिती होती. पुढे बोलतांना माजी आमदार उषाताई दराडे म्हणाल्या, माझ्या जीवनाचे शिल्पकार खर्या अर्थाने पत्रकार आहेत. मला चार मुली असली तरी देखील मी पाचवी मुलगीच दत्तक घेतली आणि दोन पत्रकारांना मी माझी मुलेच मानते. त्यामध्ये स्व.महेश जोशी आणि नागनाथ जाधव यांचा समावेश असल्याचे मनोगत व्यक्त केले. तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या वास्तव समस्येवर प्रकाश टाकत वृत्तपत्रांचा आर्थिक कणा सुधारण्यासाठी वृत्तपत्राच्या अंकाची किंमत ही त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक असली पाहिजे आणि ती अंकाची किंमत वाचकांनी स्वीकारली पाहिजे. तरच वृत्तपत्र सृष्टी खर्या अर्थाने लोकशाही जिवंत टिकवण्यासाठी सक्षमपणे उभी राहील असे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार, वृत्तपत्र विक्रेते प्रतापराव सासवडे, ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर, ज्येष्ठ संपादक मकदूम काझी, महेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, नाट्यकर्मी भरतअण्णा लोळगे, समाजसेविका मनिषाताई तोकले, उद्योजक सुशिल खटोड, भारतीय परिवार पार्टीचे प्रदेश प्रभारी कलीम जहाँगीर, श्रीमती प्रतिभा गणोरकर यांची उपस्थिती होती. तसेच नगरसेवक अनिल शेटे, स्वातंत्र्यसैनिक पाल्य संघटनेचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा, शेखर कुमार, बालाजी तोंडे, शेख आयेशा, आत्माराम वाव्हळ, रईस खान, वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण, सुमूर्ती वाघिरे, अमित कुलकर्णी, संजय कुलकर्णी, शैलेश गोलांडे, इरफान शेख, वैजीनाथ चव्हाण, अंकुश शेनकुडे आदिंची उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ.गणेश ढवळे, मनिषाताई तोकले, अशोक तांगडे, गौतम आगळे, डॉ.ओस्तवाल, पत्रकार भागवत तावरे, संपादक गंगाधर काळकुटे, द्वारकादास फटाले, अल्ताफ शेख, डॉ.जतीन वंजारे, तत्वशिल कांबळे, भीमराव दळे, शाहेद पटेल, प्रा.विद्या जाधव, मिस महाराष्ट्र विजेत्या महिला पोलिस प्रतिभा सांगळे, गणेश बजगुडे, मनिषा स्वामी, मनिषा पवार, राजू वंजारे, अभिजीत वैद्य, रुक्मिीणी नागापुरे, डॉ.कांबळे सुरेंद्रनाथ, दिपक थोरात, डॉ.संजय तांदळे, एस.एम.युसूफ, रेवती दिवार, पै.अल्फिया जब्बार शेख, सय्यद रहमान सय्यद अली, गणेश माने, अनुरथ वीर, राम नवले, माऊली सिरसट, तायक्वाँदो मधील पहिले पीएचडी धारक कराटे प्रशिक्षक डॉ.शेख शकील, नितीन महुवाले, सय्यद अरशद सय्यद समद, शिवप्रतिष्ठाण अहमदनगरचे राहूल ढेमरे पाटील, राम फाळके आदि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने विशेष गुणगौरव सन्मानपत्र, स्मृती चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बीडचे दर्पणकार 2022 पुरस्काराने दैनिक युवा सोबतीचे संपादक गुलाब भावसार आणि माजी राष्ट्रपती स्व.अब्दुल कलाम यांच्या नावे दिला जाणारा प्रतिष्ठेचा आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते प्रतापराव सासवडे यांना स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ आणि रोख रक्कमेसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष मानूरकर, महेश वाघमारे, मकदूम काझी, डॉ.गणेश ढवळे, प्रतिभाताई गणोरकर, सत्कारमूर्ती गुलाब भावसार, प्रताप सासवडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक वैभव स्वामी यांनी तर आभार नागनाथ जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने करोना नियमांचे पालन करुन उपस्थित होते.
सत्कारमूर्ती गहिवरले
51 वर्षाच्या प्रदीर्घ वृत्तपत्र विक्री व्यवसायात पहिल्यांदाच पत्रकार संघाने माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावे दिला जाणारा आदर्श वृत्तपत्र विक्रेते हा पुरस्कार जीवनात स्वीकारत असल्याने आज ज्या क्षेत्रात काम करतो त्याचा अभिमान वाटला. असे म्हणून सत्कारमूर्ती प्रतापराव सासवडे आपल्या जुन्या आठवणींनी गहिवरले. तर बीडचे दर्पणकार पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार यांनी 45 वर्षापूर्वीची पत्रकारीता आणि खडतर प्रवास यावर विस्तृत मनोगत व्यक्त करुन पत्रकारांनी सामाजिक प्रश्नांना आपल्या लेखनीतून न्याय द्यावा. तसेच लोकशाही टिकवण्यासाठी सडेतोड वास्तव लिखान करावे असे आवाहन करुन प्रामाणिक पत्रकारीता करत असताना हा मिळालेला पत्रकार संघाच्या वतीने पहिला सन्मान असल्याने अविस्मरणीय ठरेल अशी भावना व्यक्त करत आपल्या भावनांना आनंदाश्रुंनी वाट मोकळी करुन दिली.