By MahaTimes ऑनलाइन – बीड |
भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या मानवतावादी साहित्याच्या झुंजार लेखनीच्या माध्यमातून परिचित असणारे लोकशाहीर सत्यशोधक बहुजन नायक अण्णाभाऊ साठे महाप्रबोधनकार आहेत हे केंद्र सरकारला माहित नसणे म्हणजे हेतूपुरस्सर खोडसाळपणे जातीय द्वेषातून तळहाताने सूर्य झाकण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. अशा जातीवादी, खोडसाळ धर्मांध केंद्र सरकारचा राष्ट्रवादी तालुका महिला आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्षा जयश्री वाघमारे यांनी जाहीर निषेध केला आहे.
केंद्रातील भाजपा सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्याआधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन विभागामार्फत महापुरुषांच्या यादीत जागतिक कीर्तीचे साहित्यिक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे कमी दर्जाचे असल्यामुळे या सूचित नाव समाविष्ट करता येणार नाही असा खुलासा केला आहे.
अशा या जातीवादी भाजप सरकारचा राष्ट्रवादी तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयश्री वाघमारे यांनी जाहीर निषेध केला आहे.