कोरोनाचा वाढता प्रभाव आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर घेतला हा निर्णय
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा 6 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने (Aurangabad Municipal Corporation) घेतला आहे. या काळात शाळा पुन्हा ऑनलाईन (Online) पद्धतीने सुरु राहणार आहेत.

दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरु राहतील. शहरात रोज नव्या भागात रुग्णांचे निदान होत आहे. शिवाय ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शहरात काही दिवसांपूर्वी दोन ओमीक्रॉन (Omicron) बाधीत आढळून आले होते. ते उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, आता शहरात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या अचानक वाढत आहे. मंगळवारी तब्बल 103 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. शहराचा पॉझीटीव्हीटी रेट (Positive Rate) सुद्धा वाढत जात आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने (Municipal administration) खबरदारीचा उपया म्हणून शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय उद्या गुरुवार ( दि. 6 जानेवारी ) पासून अंमलात येणार आहे. शाळा बंद झाल्यानंतर पुन्हा ऑनलाईन अध्ययन (Online Study) सुरु करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. असा वाढला पाॅझिटिव्हिटी रेटशहरात 27 डिसेंबर पाॅझिटिव्हिटी रेट 0.16 टक्के होता. या दिवशी शहरात 4 रुग्णांची वाढ झाली होती. आठ दिवसांत शहरातील नव्या रुग्णांची संख्या 4 वरून सोमवारी 29 वर गेली. पाॅझिटिव्हिटी रेट 1.21 टक्के राहिला.