By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड शहर स्वच्छ व धुळमुक्त करण्यासाठी बीड नगर परिषदेच्या माध्यमातून 3 अद्ययावत हायड्रोलीक ब्लूमर मशिन्स खरेदी करण्यात आल्या असून, बुधवारी नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत या पैकी एका मशीन ची टेस्टिंग करण्यात आली. या मशिन्स मशिन्स चे बीड शहर वासीयांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आले.

गेल्या आठवड्यात नगराध्यक्षांनी स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची बैठक घेऊन स्वच्छतेच्या संदर्भात माहिती घेत आवश्यक असणार्या बाबींविषयी माहिती घेतली होती. त्यावेळीच नगराध्यक्षांनी अधिकार्यांना या मशिन्स उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. शहरातील के.एस.के.कॉलेज रोड वरील ओपन जिम समोर ही मशीन चालवून रस्ता स्वच्छ करून टेस्टिंग करण्यात आली. रस्त्यांवरील धूळ पूर्णपणे नाहीशी व्हावी व शहरातील रस्ते स्वच्छ राहावेत यासाठी नगर परिषद स्वच्छता समितीच्या वतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न भविष्यातही करण्यात येतील असे यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.

याप्रसंगी सभापती विनोद मुळूक, ईलियास भाई, नगरसेवक मुखीद लाला, गणेश वाघमारे, विकास जोगदंड, इकबाल भाई, मुन्ना ईनामदार, बाळासाहेब घोडके, बाळासाहेब अंबेकर, अमर विद्यागर, बाबा खान, हामेद चाऊस, खलील शेख यांच्यासह नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.