मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात नव्हे, तर अज्ञात व्यक्ती ने यशराज चा गळा चिरला
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
किल्लेधारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील एका 6 वर्षी लिटील बॉय यशराज वन्यपशूच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची चर्चा सोमवारी (दि.3) झाली होती. मात्र बालकाचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला नसून त्यांची अज्ञात व्यक्ती ने गळा चिरून निर्दयीपणे हत्या केल्याचे से पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात धारुर पोलिसांत रात्री उशिरा खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथील शेळी व मेंढीपालन व्यवसायीक दत्तात्रय आश्रुबा दराडे यांचा मुलगा यशराज (वय 6 वर्ष) हा गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. यशराजच्या चेहर्यावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. नातेवाईकांनी जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सदरील बालकाचा मृत्यू वन्य प्राण्याच्या हल्लात जखमी होउन झाल्याची चर्चा सोमवारी ऐकावयास मिळाली. धारूर पोलिस प्रशासनासह वन विभागाला शंका आल्याने सदर प्रकाराची सखोल चौकशी केली. कृर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलिस अधिक्षक तथा केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक वैद्यकीय अहवालानूसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी वन विभागाचे अधिकारी, कर्मचार्यांसोबत घटनास्थळ पिंजून काढला. यात वन्यप्राण्याचे कसलेही ठसे अथवा खानाखूणा आढळून आले नाहीत. बालकाचा गळा चिरला गेला असल्याने सदरील प्रकार हा खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डैडीज लिटील बॉय
अज्ञात व्यक्तीच्या रोषास बळी ठरलेला लहानग्या यशराज चा फोटो वायरल झाला. त्याच्या टीशर्टवर ‘डैडीज लिटील बॉय’ असे लिहीलेले असून त्याचा निरागस चेहरा पाहून सर्वच जण हळहळ व्यक्त करीत आहे. या लहान बालकाची हत्या अंधश्रृध्देचा प्रकार तर नव्हें या दिशने ही तपास व्हावा अशी भावना लोक व्यक्ती करीत आहेत.