By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस बॉईझ संघटनेचे तरुण तडफदार नेतृत्व असलेले सय्यद शहेराज उर्फ मोनू यांचे मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव योगदान राहिले आहे. त्यांनी सामाजिक व विद्यार्थी चळवळीत काम केले. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील प्रश्न असो की विद्यालय स्तरावरील प्रश्न असो ते सोडविण्यासाठी सदैव योगदान राहिले आहे.
शहरी ,ग्रामीण, तसेच पोलीस पाल्यविद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तळमळीने काम करून महाराष्ट्र पोलीस बाँईज विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना शासकीय विश्रामग्रह बीड येथे महाराष्ट्र पोलीस बॉईझ संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या कडून विध्यार्थी जिल्हाअध्यक्ष पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले.
सय्यद शहेराज यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईझ संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी सय्यद शहेराज यांची महाराष्ट्र पोलीस बॉईझ संघटना विद्यार्थी जिल्हाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या यानिवडीबद्दल सर्व स्थरातून त्यांचे, स्वागत होत आहे.
जिल्हाध्यक्षपदी निवड करून माझ्यावर जो सार्थ विश्वास दाखवला. त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाणार नाही व पूर्ण जिल्ह्यात एका नव्या ऊर्जेने विध्यार्थ्यांना सोबत घेऊन काम करेल.
– सय्यद शहेराज, जिल्हाअध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस बॉईझ संघटना