By MahaTimes ऑनलाइन – बीड |
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा स्वराज्याच्या मातोश्री माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विविध समााजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द करण्यात आली असू जिजाऊ गार्डन या ठिकाणी 12 जानेवारी रोजी सकाळी जिजाऊ माँ साहेब यांना मानवंदना देण्यात येणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले.
स्वराज्यमाता माँ साहेब जिजाऊ जयंती दरवर्षीबीडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने काही निर्बंध सांगितले आहेत. त्याच अनुषंगाने सर्वांनाच सोयीचे म्हणून यावर्षी कुठलीही शोभायात्रा काढण्यात येणार नाही. परंतु समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये 12 जानेवारी रोजी काळी 8.30 वा. जिजाऊ पुजन, ध्वजारोहण व मानवंदना यानंतर भव्य रक्तदान शिबीर, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे सुध्दा आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण बीड शहरामध्ये विविध भागात होर्डिंग्ज, बॅनर्स, तसेच भगव्या पताका लावून संपूर्ण शहर भगवेमय करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमांमध्ये सवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यातआले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सामुहिक राष्ट्रगान

भारत देशाच्या स्वातंत्र्याचा 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेष पोलिस बॅन्ड पथकामार्फत सामुहिक राष्ट्रगानाचे सुध्दा आयोजन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच बीड शहरातील ज्या मुलींनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे त्यांच्या हस्ते पुजन व ध्वजारोहण करण्यात येणार आहे.