आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिदिन 5 हजार टेस्टींग ची क्षमता
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
RTPCR TESTING LAB आरोग्य मंत्री व मा.ना.धनंजयजी मुंडे, पालकमंत्री बीड यांचे हस्ते उदघाटन दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा रुग्णालय, बीड येथे नव्याने सूरु करण्यात येणा-या RTPCR TESTING LAB लॅबचे उदघाटन मा.ना.राजेशजी टोपे,आरोग्य मंत्री,महाराष्ट्र राज्य तसेच मा.ना.धनंजयजी मुंडे, पालकमंत्री, बीड यांच्या उपस्थीतीत होत आहे.
जिल्हात यापूर्वी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध होती. मा.ना.धनंजयजी मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्हयासाठी जिल्हा रुग्णालय,बीड येथे सूसज्य अशी RTPCR TESTING ची अदयावत लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबव्दारे दररोज 5000 एतके टेस्टींगहोऊ शकते.
भविष्यात कोविडच्या तिस-या लाटेच्या अनुशंगाने वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने रुग्णांचे निदान त्वरीत होण्यासाठी या लॅवचा उपयोग होणार असून अशा प्रकारची सुविधा जिल्हा रुग्णालयात सूरु होणारअसल्याने रुग्णसेवेसाठी तत्पर असलेल्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक सुविधा उपलब्ध केल्याबददलबीडच्या जनतेची सोय केल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे अभिनंदन होत आहे. आज 4 जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला ना.राजेशजी टोपे, आरोग्य मंत्री हे Vertually उपस्थीत राहणार असून मा.ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडणार आहे.
या प्रसंगी बीडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शिवकन्या सिरसट, खासदार रजनी पाटील,खासदार डॉ.प्रितम मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाशसोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुदंडा, आमदार संजय दौड, आमदार बिनायक मेटे, आमदार सतिष चव्हाण, आमदारविक्रम काळे, आमदार सुरेश धस, नगराध्यक्ष भारतभूपण क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनिल धांडे, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार उषा दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमूख, शिवसेनेचेकुंडलीक खांडे व आप्पासाहेब जाधव मुंबई कु.उ. बा. समितीचे सभापती अशोक डुक आदी उपस्थीत राहणार आहेत.
तसेच जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. बीड अजितपवार, जिल्हा पोलिस अधिक्षक ए.राजा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख यांची उपस्थितीराहणार आहे.तरी कोविडच्या सर्व नियम व अटींचे पालन करून या सोहळयास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केले आहे.