By MahaTimes ऑनलाइन – बीड |
लोकसेना संघटनेची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक दोन जानेवारीला संध्याकाळी लोकसेना संपर्क कार्यालयामध्ये प्रा. इलियास इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

ही बैठक शहर व तालुकास्तरावरच्या पदाधिका-यांची होती या बैठकीमध्ये शहरातील विविध मुद्दयाँवर चर्चा करण्यात आली जसे की लोकसेना नव्वद टक्के समाजकारण व दहा टक्के राजकारणार करणार अशी घोषणा यापूर्वीही लोकसेनेकडून करण्यात आलेली होती यामुळे होणाऱ्या बीडच्या नगरपालिका निवडणूकीत लोकसेना स्वबळावर लढणार असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

स्वच्छ बीड स्वच्छ नगरपालिका करण्यासाठी लोकसेना मैदानात उतरणार आहे व लवकर पक्ष निरीक्षकाची निवड करुन पक्ष कार्यालयात उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येणार आहे मुलाखतीची तारीख वेळ कड़वण्यात येईल असे आव्हान लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे. याबैठकीला प्रा. संजय खांडेकर ऐड. कलीम काज़ी, शहराध्यक्ष शेख अयाज़ अख्तर, तालुकाध्यक्ष अतीख अहमद खान, ओबीसी शहराध्यक्ष अकबर अतार, नूर पठान, रज़ी भैय्या उपस्थित होते व शेवटी सर्वांचे आभार मिर्ज़ा खैसर बेग यांनी मानले.