By MahaTimes ऑनलाइन – बीड |
एआयएमआयएम पक्षाचे युवा नेते सय्यद इलयास यांनी मुहम्मदिया कॉलनीतील शेकडो रहिवाशांना मोफत ई-श्रम कार्ड काढून दिले. जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांच्या हस्ते ‘ई-श्रम कार्ड’ चे वाटप करण्यात आले.
सय्यद इलयास यांनी मोफत ई-श्रम कार्ड काढून देण्याची मोहीम राबविली. याचा लाभ मुहम्मदिया कॉलनीतील शेकडो रहिवाशांनी घेतला. चार दिवसात शेकडो रहिवाशांना ई-श्रम कार्ड काढून दिल्यानंतर एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक शेख मतीन, खन्ना भैया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शफिक भाऊ म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून आमच्या पक्षाचे युवानेते सय्यद इलयास हे या प्रभागातील नागरिकांसाठी मोठ्या धडाडीने सामाजिक कार्य करीत आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन लवकरच येऊ घातलेल्या बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये पक्ष त्यांच्या उमेदवारीचा पुरेपूर विचार करणार असून या परिसरातील नागरिकांनी त्यांना साथ द्यावी. एका तळमळीच्या कार्यकर्त्याला नगरसेवक बनवून बीड नगर परिषदेत पाठवावे असे आवाहन केले.