महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संघाने मिळवले उपविजेता पदक
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन व कुटे ग्रुपच्या वतीने आयोजित बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिगमध्ये 2 जानेवारी रोजी फायनल, सेमिफायनल सामने खेळविण्यात आले. यामध्ये फायनल सामना बीड ब्लास्टर्स संघाने जिंकला. मान्यवरांच्या उपस्थितीत या संघाला विजेतेपद देण्यात आले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संघाने मिळवले उपविजेता म्हणून सन्मानित करण्यात आले.

बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन व कुटे ग्रुपच्या वतीने 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्हा स्टेडिअम येथे बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिगचे प्रथम आयोजन करण्यात आले होते. लिगमध्ये रोज बारा संघांमध्ये सामने खेळविण्यात आले. तीन दिवसीय सामन्यांतून स्टेट बँक ऑफ इंडिया संघ, महसूल अधिकारी, कर्मचारी संघ, बीड ब्लास्टर्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक संघ या चार संघांमध्ये फायनल व सेमी फायनल सामने खेळविण्यात आले. यामध्ये सेमीफायनलमध्ये पहिला सामना स्टेट बँक ऑफ इंडिया विरुध्द बीड ब्लास्टर्स सामना झाला. सामन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाने 10 षटकारामध्ये प्रथम फ लंदाजी करत 58 धावा करत 5 बळी दिले तर बीड ब्लास्टर्सने 9 गडी राखत 7.2 चेंडूत 62 धावा करत विजयश्री खेचून आणला. बीड ब्लास्टर्सचे जय रसाळ यांना मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले. दुसरा सामना महसूल अधिकारी कर्मचारी संघ आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्यात झाला.

या सामन्यात महसूल अधिकारी कर्मचारी संघाने 4 गडी बाद होऊन 107 धावा केल्या तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संघाने केवळ 9 षटकारात हा सामना जिंकला. फ ायनल सामना बीड ब्लास्टर्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक संघ यांच्यात झाला. यामध्ये प्रथम बीड ब्लास्टर्सने फ लंदाजी केली. या संघाने 3 गडी बाद करत महाराष्ट्र ग्रामीण बँक संघापुढे 102 धावांचे लक्ष्य ठेवले. महाराष्ट्र ग्रामीण बँक संघाने केवळ 87 धावा केल्या. अशा प्रकारे बीड ब्लास्टर्सच्या खेळाडूंनी उत्कृष्टपणे खेळून फ ायनल सामना जिंकला. या संघाचे विजय पदमुले यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा स्टेडिअमवर विजेत्या संघांना पारितोषक वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा व मुख्य सत्र न्यायाधीश हेमंत महाजन, कुटे ग्रुपचे उपाध्यक्ष राहुल ढोले, उपाध्यक्ष अमोल पारसकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रेडाईचे इंजि.अतुल संघानी, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.सदानंद राऊत, बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कासट, उपाध्यक्ष जगदीश जाजू, कोषाध्यक्ष ओमप्रकाश लोहिया, सचिव आदेश नहार, प्रोजेक्ट चेअरमन पंकज टवाणी तसेच असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
यांचाही झाला सन्मान
बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिगमध्ये झालेल्या सामन्यातील उत्तम फ लंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरिज असा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये महसूल अधिकारी, कर्मचारी संघाचे विकास कोरडे (206 धावा) यांना उत्तम फलंदाज, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रणय पाटील यांना उत्तम गोलंदाज (7 बळी) तर मॅन ऑफ द सिरिज पुरस्काराने बीड ब्लास्टर्सचे विजय पदमुले (1 शतक व 1 अर्धशतक एकूण 195 धावा) यांना सन्मानित करण्यात आले. यासह लिगमध्ये सहभागी सर्व संघांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.