सोन्याच्या बांगडीसह डायमंड, नवरत्नाचे खडे घेऊ न महिला झाली पसार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
नवीन वर्षाचा उत्साह केक कापून करने एका सोन्याच्या व्यापाराला चांगलेच महागात पडले. ग्राहक बनून आलेल्या एक महिले ने नजर चुकवत सोन्याच्या बांगडीसह डायमंड, नवरत्नाचे खडे असा 1 लाख 42 हजार रूपयाचा मौल्यवान ऐवज घेऊ न महिला पसार झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी औरंगाबाद शहरातील मोंढा नाका परिसरात घडली. याप्रकरणी रविवारी अज्ञात महिलेविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाली.

फिर्यादी अशोक अंकुश गायकवाड (28 वर्षे धंदा- खा.नोकरी, रा. त्रिमुर्ती कल्याणेश्वर हाऊसिंग सोसायटी, मुकुंदनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद ) हे औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील मोंढा नाका येथील मलाबार गोल्ड अॅन्ड डायमंडस येथे मार्केटिंग एक्सीक्युटिव्ह म्हणून काम पाहतात. काल शनिवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान दुकानात एक बुरखा परिधान केलेली महिला दुकानात आली मुझे जल्दी जाना है, असे सांगुन मुझे सोने के चुडीया जल्दी बताओ असे म्हणून पाहण्याच्या बहाण्याने सोन्याच्या बांगडीसह डायमंड, नवरत्नाचे खडे असा 1 लाख 42 हजार 553 रूपयाचा 24 ग्रॅम 500 मिली वजणाचा मौल्यवान ऐवज घेतला.
दरम्यान फिर्यादी अन्य ग्राहकांना सोने-चांदीचे दागिने दाखवित होते. तसेच दुकानात नव वर्षानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम सुरू असतांना नजर चुकवून वरील मौल्यवान ऐवज घेऊन पसार झाली.
सदरची बाब उजेडात येताच या प्रकरणी अशोक अंकुश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रविवारी (दि. 2) रोजी दुपारी 1 वाजण्याच्यासुमारास जिन्सी पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरूध्द कलम 379 भादंविनुसार गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक श्री. तांगडे हे करीत आहेत.