By MahaTimes ऑनलाइन – बीड |
भाजप (BJP) नेते रेल्वेचे स्वागत करण्यात एवढे उत्साहित झाले होते की त्यांना कोरोना महामारीचा विसर पडला. त्यांनी आज जालन्याहून धावलेल्या हडपसर विशेष रेल्वेचे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर स्वागत करतांना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडविले.

रेल्वेने नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसचे रूपांतर नांदेड-हडपसरमध्ये केले असून आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. आज उदघाटनाची रेल्वे जालना येथून धावली. या रेल्वेचे औरंगाबादेत भाजप नेत्यांनी स्वागत केले. मात्र यावेळी नेत्यांनी मास्क वापरण्याकडे आणि सोशल डिस्टन पालन करण्याकडे दुर्लक्ष केले. वेळ बदलून अधिक कोच लावलेपूर्वी धावत असलेल्या नांदेड-पुणे रेल्वेची वेळ बदलून आणि नवीन आधुनिक एलएसबी तंत्रज्ञानाचे बोगी बसवून ही रेल्वे धावणार आहे. रविवार आणि मंगळवार रोजी नांदेडहून नवीन गाडी आता रात्री ९.३० ऐवजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल.
पुणे येथे सकाळी ९.४० वाजता पोहचणारी सुपर फास्ट गाडी आता सकाळी ७ वाजता हडपसरला पोहोचेल. नवीन रेल्वे परतीच्या प्रवासाला हडपसरहून सोमवार आणि बुधवारी रात्री १२ वाजता निघेल यापूर्वी पुणे स्तानकावरून रात्री १० वाजता निघायची. नवीन रेल्वे नांदेडहून रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता निघेल. विस डब्यांची गाडी पूर्णा (सायं. ७ वा.) परभणी (१९.२८), सेलू (२०.०४), परतूर (२०.२४), जालना (२१.१३), औरंगाबाद( २२.२०), अंकाई(१), मनमाड( रात्री १.१५), कोपरगाव (१.२३), बेलापूर(२.१३) अहमदनगर(३.१०), दौंड कॉर्ड लाईन( ५.३८) हडपसर (६.५५).