शेतकरी नेता नरवडे व नायब तहसीलदार कुंभार चतुर्भूज
उप अधिक्षक भारत राऊत यांचा वर्षअखेरीस घूसखोरांना दणका
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
माजलगांव तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी विरोधातील तक्रारीची चौकशी न करण्यासाठी नायब तहसीलदाराशी हाथमिळवणी करीत तब्बल 1 लाख रूपयाची सौदेबाजी करणाºया शेतकरी नेता अशा दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली. वर्षाच्या शेवटी झालेली ही कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे.

शासकीय काम असो अथवा कोणतेही पैशांची देवाण-घेवाण शिवाय पान हलत नाहीं. माजलगाव तालुक्यातील गंगामसला शिवारात शेत रस्ता करण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी तहसीलकार्यालयात सादर केलेला पंचनामा अहवाल खोटा असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक नामदेवराव नरवडे यांनी केला होता. सदर प्रकरणाची चौकशी करावी या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयास दिला होता.
सदर दाखल तक्रारीची चौकशी करून त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे प्रकरण माजलगाव तहसीलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सैदाराम तुकाराम कुंभार यांच्याकडे होते. मात्र तक्रारदार लाचेची रक्कम देण्यास तैयार नव्हते त्यांनी याबाबत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लिखित स्वरूपात तक्र ार दाखल केली होती. यावर उपअधीक्षक भारतकुमार राऊत यांनी शुक्रवार, 31 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास माजलगाव तहसिल कार्यालयात मंडळाधिकारी यांच्या कडून लाचेची रक्कम 1 लाख रूपए घेतांना सैदाराम तुकाराम कुंभार व शेतकरी संघटना बीड जिल्हाध्यक्ष अशोक नामदेवराव नरवडे यांस रंगेहात पकडुन गजाआड केले. यातील आरोपी लोकसेवक कुंभार याचे सेवानिवृत्ती अवघ्या सहा महिण्यांवर येऊन ठेपलेली आहे माहिती सूत्रांनी दिली.
सदरची कारवाई उप अधीक्षक भारतकुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी, जमादार सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमंत गोरे, श्री. निकाळजे, श्री. खरसाडे, चालक म्हेत्रे यांनी केली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.