By MahaTimes ऑनलाइन – मुंबई |
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत रविवार दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2021 पुढे ढकलण्यात आली आहे.
या संदर्भात शासन निर्णय, क्रमांक : सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : एसआरव्ही -2021 / प्र.क्र .61 / कार्या -12, दिनांक 17 डिसेंबर, 2021 अन्वये शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असेही आयोगाने कळविले आहे.