By MahaTimes ऑनलाइन वृत्तसेवा – औरंगाबाद |
नाशिक येथून लग्नसमारंभ उरकून परत येत असताना जीप पलटून झालेल्या भीषण अपघातात भराडी येथील माजी ग्रा.पं.सदस्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला व इतर गंभीर जखमी झाले. हा अपघात कन्नड-सिल्लोड महामार्गावर मंगळवारी रात्री रात्री दीडच्या उशीरा झाला.
नाशिक येथून परतणारी जीप (MH 20 BC 6623) कन्नड तालुक्यातील सारोळा व मोहाडीफाट्यादरम्यान जीप दोन पलट्या घेऊन बाजूच्या शेतात जाऊन थांबली. या अपघातात भराडीचे माजी ग्रा.पं.सदस्य प्रदीपसिंग सुंदरसिंग गौर (वय 56) व लता शिवसिंग गौर (वय 50) हे दोघे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती समजताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सपोनि कोमल शिंदे, बीट जमादार वसंत पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीने सिल्लोड येथील रुग्णालयात हलवले. या अपघाताची पिशोर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.