By MahaTimes – ऑनलाइन वृत्तसेवा | कलबुर्गी
सोलापुर येथील आदर्श शिक्षक इंटरनेशनल एजुकेशन अवार्ड विजेता नूरअहमद बशीर कारंजे यांचा रविवारी (दि. 26) कर्नाटक राज्यातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथे सत्कार करण्यात आला.
नूरअहमद बशीर कारंजे हे सोलापुर येथील यशोधरा प्रशाला येथे सह शिक्षक पदावर कार्यरत असून विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा राज्यस्तरीय व जिल्हास्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्य करतात. नुकतेच दिल्ली येथे मेंटोरएक्स, दिल्ली व काईट्सक्राफ्ट प्रॉडक्शन, पंजाब च्यावतीने वर्ष 2021 चा इंटरनेशनल एजुकेशन अवार्ड देउन सन्मानित करण्यात आले. असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रविवारी कलबुर्गी (गुलबर्गा) शहरातील नूर बाग येथे पटेल परिवाराच्यावतीने नूर अहमद बशीर कारंजे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युफ्लेक्स कंपनीचे सेल्स मेनेजर (वेस्ट रिजन) अफ्रोज अहमद, लाबोरेट फार्मास्युटिकलचे रिजनल मेनेजर (पुणे डेपो) सैफन पटेल व वेबकेअर सोलुशन कंपनीचे संचालक फेरोज अहमद व इस्माईल पटेल यांची उपस्थिती होती.

तसेच कलबुर्गी येथील शहापूर तालुक्यातही नूर अहमद बशीर कारंजे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करताना सीवील इंजीनियर इरफान नाडगौडा व इतर.

