बीड, माजलगाव, धारूरमध्ये उपविभागीय अधिकारी तर अंबाजोगाई, परळी, गेवराईत मुख्याधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
कोरोनाच्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवड प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने आणि मुदत संपलेल्या नगर पालिकांची निवडणुक प्रक्रिया पुर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने काढले आहेत. बीड सह अंबाजोगाई, माजलगाव, परळी, गेवराई, धारूर या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.

मुदत संपलेल्या नगरपालिकांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश शासनाने काढले आहेत . संबंधित नगरपरिषदांची मुदत संपताच प्रशासक पदभार स्वीकारणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. बीड, माजलगाव, धारूर नगरपरिषदेवर उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई, परळी, गेवराई नगरपरिषदेवर मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहा नगरपालिकांची मुदत वेगवेगळ्या तारखेला संपणार असल्याने त्याच दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
मुदत संपताच प्रशासक कार्यभार स्वीकारणार
बीड नगर परिषद- १६ जानेवारी २०२२ अंबाजोगाई नगर परिषद – २ जानेवारी २०२२ धारूर नगर परिषद – २ जानेवारी २०२२ माजलगाव नगर परिषद- ४ जानेवारी २०२२ परळी नगर परिषद- २९ डिसेंबर २०२१ गेवराई नगर परिषद- २९ डिसेंबर २०२१