विनायकराव मेटे यांच्या “एक धाव कुटुंबासाठी” या नाऱ्याला साथ
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड येथे आयोजित व्यसनमुक्ती अभियानांतर्गत “रण फॉर हेल्थ” ही बीड मॅरेथॉन २०२१ आज पहाटे पार पडली. यात अपेक्षापेक्षा जास्त स्पर्धक, नागरिकांनी मॅरेथॉनमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. आ.विनायकराव मेटे, सिने अभिनेते देवदत्त नागे, भारत श्री स्नेहा कोकणे पाटील, सीए. भानुदास जाधव, प्रभाकर कोलंगडे यांनी छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवरून सुरू होणाऱ्या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली.

बीड येथे मराठवाडा लोक विकास मंच, मुंबई, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाण, बीडच्या वतीने आयोजित बीड मॅरेथॉन स्पर्धत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आ. विनायकराव मेटे यांच्या “एक धाव कुटुंबासाठी” या नाऱ्याला साथ देत स्पर्धकांनी मॅराथॉन स्पर्धेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भल्या पहाटे थंडीची चादर दुर करत हजारो बीडकरांनी आज पहाटे बीड मॅरेथॉनमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
सिने अभिनेते देवदत्त नागे, भारत श्री स्नेहा कोकणे पाटील यांनी दिलेली दिलखुलास दाद आणि आ. विनायक मेटेंच्या नियोजनात बीडकर मोठ्या उत्साहाने धावले. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य आज पहाटे छत्रपती संभाजीराजे क्रिडा संकुल येथे पहायला मिळाले. जोशपूर्ण वातावारणात कडाक्याच्या थंडीतही स्पर्धकांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
कोण काय म्हणाले :
विनायक मेटे : आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचे असल्याचे सांगत सकारात्मक विचाराची व्यायामाशी सांगड घाला, असे आवाहन यावेळी आ. विनायक मेटे यांनी केले. यावेळी मेटे यांनी उपस्थित स्पर्धकांसह बीडकरांचे आभार मानले
देवदत्त नागे : पहिल्याच वर्षी आयोजित या स्पर्धेचा जोश पाहून देवदत्त नागे हे भारावुन गेले अपेक्षा पेक्षा जास्त गर्दी पाहता आणि विनायक मेटे यांची व्यसन मुक्ती संदर्भातील कार्य, तळमळ पाहता ‘मेटे साहेब, जबरदस्त’ अशी प्रतिक्रिया सिने अभिनेते देवदत्त नागे यांनी जाहीररित्या व्यक्त केली.
भारत श्री स्नेहा कोकाणे पाटील : बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. या जिल्ह्याची ही ओळख आ. मेटे साहेब पुसून काढतील त्याची ही सुरवात आहे. मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे हे मोठे धाडसाचे काम आहे आणि हे काम आ. विनायक मेटे यांनी करून दाखवले आहे असे मत भारत श्री स्नेहा सचिन कोकणे पाटील यांनी व्यक्त केले.