बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन व कुटे ग्रुपचा पुढाकार
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन व कुटे ग्रुपच्या वतीने यंदा प्रथमच बीडमध्ये प्रोफेशनल चॅम्पियन लिग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्टेडिअम येथे दि.24 ते 26 डिसेंबर आणि 2 जानेवारी या कालावधीत हे सामने होणार आहेत.

बीड जिल्ह्यात विविध संघटनांकडून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यातून नवोदित खेळाडू घडतात. याच धर्तीवर विविध शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन व कुटे ग्रुपच्या वतीने प्रोफेशनल चॅम्पियन लिग घेण्यात येणार आहेत. या क्रिकेट स्पर्धेमध्ये बीड शहरातील कलेक्टर ऑफिस बीडचा संघ, आयकर व विक्रीकर कार्यालय, एक्साईज कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बॅक, पूर्णवादी नागरी सहकारी बँक, रोटरी परिवार बीड, क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन, इडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, अॅडव्होकेट असोसिएशन, अकाऊंटंट असोसिएशन, चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन असे एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत.
दि.24 डिसेंबर रोजी बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिगचे उद्घाटन विवेकजी हरपाळे, चीफ मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, अविनाशजी कामतकर, रिजनल मॅनेजर, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सुरेशजी व अर्चनाजी कुटे, संचालक, द कुटे ग्रुप, अरविंदजी विद्यागर साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धा 24 ते 26 डिसेंबर या कालावधीत होणार्या स्पर्धेत रोज सहा सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेदरम्यान कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले जाणार आहे. 2 जानेवारी रोजी सेमीफायनल आणि फायनल सामने होणार आहेत. या दिवशी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रत्येक सामन्यमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात येणार आहे.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाबी… शर्मा, जिल्हा सत्र मुख्य न्यायाधीश हेमंत महाजन, सेंट्रल जी. एस. टी., जालना असिस्टंट कमीश्नर गोपाल शहा, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, न्यू दिल्ली सेन्ट्रल कौन्सिल मेम्बर सी. ए. व उमेशजी शर्मा उपस्थित राहणार आहेत. बीड शहरातील क्रिकेट प्रेमींनी बीड प्रोफेशनल चॅम्पियन लिग क्रिकेट सामन्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सी. ए. गोपाल कासट, सचिव सी. ए. आदेश नहार, प्रोजेक्ट चेयरमन सी. ए. पंकज टवाणी, सी. ए. गिरीष गिल्डा व सर्व पदाधिकारी व सदस्य बीड जिल्हा चार्टर्ड अकाऊंटन्ट व टॅक्स प्रॉक्टिशनर असोसिएशन यांनी केले आहे.