पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील घटनेने गावात हळहळ
By MahaTimes ऑनलाइन – पाटोदा |
पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे एक हृदयद्रावक घटना घडली. जेवण करून घरांसमोर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शतपावली करीत असलेल्या दोन संख्या बहिणींना भरधाव वेगाने आलेल्या जीपने धडक दिली. यात गंभीर जखमी दोघींचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीररित्या जखमी झाले.

रोहिणी महारुद्र गाडेकर (26) आणि मोहिनी महारुद्र गाडेकर (22) अशी मयतांची नावे आहेत.
या दोन्ही बहिणी त्यांच्या धनगर जवळका गावी आल्या होत्या. रोहिणी नर्सिंंग चे शिक्षण घेत असून मोहिनी खासगी कंपनीत कामाला होती. रविवारी रात्री जेवल्यानंतर दोघेही घरासमोर असतांना ही घटना घडली. भरधाव वेगात येणार्या जीपच्या (एमएच 12 एमआर 9113) चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत त्यांना जोराची धडक दिली व दोनशे फूट फरफटत नेले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. तर याच जीप ने पुढे जाऊन अजित मोरे व संतोष आगे यांना उडविले यात ते ही गंभीर जखमी झाले. यानंतर जीप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
अपघाताची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जीप ताब्यात घेतली. सोमवारी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून दोन्ही बहणींचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पाटोदा ठाण्यात जीपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.