By MahaTimes ऑनलाइन – माजलगाव, बीड |
खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून वर्र्षभरात शेतकरी पिता-पुत्रांनी आत्महत्या केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथे प्रकाशात आली. पित्याच्या वर्षश्राध्द कार्यक्रमाच्या तिसºयादिवशी शुक्रवारी 35 वर्षीय पुत्राने विष प्राशन करून आपल्या जीवनाचा अंत केला.

ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद असे मृत शेतकर्याचे नाव आहे. या तरु णाकडे असणार्या तीन एक्करवर शेतीवर खाजगी बँकेचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगितले जात आहे . कर्जापोटी हा ज्ञानेश्वर अनेक दिवसांपासून त्रस्त होता. परंतु बँकेचे कर्ज शेतातील नापिकीमुळे फिटत नव्हते. त्यामुळे हताश झालेल्या ज्ञानेश्वर ने विष प्राशन केले. ही बात सकाळी आठ वाजता नातेवाइकांच्या लक्षात आली. पण तो पर्यंत फार उशीर झाला होता.
नातेवाइकांचे म्हणणे आहे कि, खाजगी सावकारांचा तगादा वाढत असल्याने ज्ञानेश्वरने आत्महत्या केली असावी दिली. दरम्यान, वर्षभरापूर्वीच ज्ञानेश्वरच्या विडलांनीही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर आता पित्यापाठोपाठ मुलानेही कर्जाला कंटाळून वर्षभरातच आत्महत्या केल्याने गावभर हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ दीपक श्रीरंग महागोविंद याच्या माहितीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद झाला आहे.