By MahaTimes ऑनलाइन, बीड |
जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज , वडवणी नगर पंचायत निवडणूक प्रभारी म्हणून भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर यांची तर सह प्रभारी म्हणून सौ. संध्या जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी या नियुक्त्या घोषित केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, केज , वडवणी नगर पंचायत निवडणूकीची जबाबदारी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर आणि सह प्रभारी सौ.संध्या जैन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सलीम जहाँगीर यांची पक्ष पातळीवर असलेली संघटन बांधणी आणि अनुभव पाहता त्यांच्यावर पाच नगर पंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनात निवडणुका लढवल्या जात आहेत. माजी मंत्री आ.सुरेश धस , भीमराव धोंडे, राजाभाऊ मुंडे, राजेंद्र मस्के यांनी प्रचारात आघाडी घेतली असून विकासाच्या जोरावर भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. शहा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून पाचही नगर पंचायत भाजपच्या ताब्यात येणार असा विश्वास सलीम जहाँगीर व्यक्त केला.