अकरा महिण्यांपूर्वी झाला होता विवाह
By MahaTimes ऑनलाइन | बीड –
नेकनूर ठाणे हद्दीतील वैतागवाडीमध्ये एका नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.16) उघडकीस आली. राजेश जगदाळे (25) व दिपाली राजेश जगदाळे (20) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या नवदाम्पत्याची नावे आहेत. महिला सात महिण्याची गर्भवती होती अशी माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहिती अशी की, राजेश जगदाळे (25) चा विवाह मागील अकरा महिण्यांपूर्वी दिपाली (20) सोबत झाला होता. अज्ञात कारणावरून दोघांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या जीवणाचा दुखद अंत केला.
सदर घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस (Neknoor Police) घटनास्थळी पोहचली व पंचनामा करून दोघांचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेकनूर येथील रूग्णालयात (Hospital) दाखल केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू चा गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते.