जगमित्र कारखान्याचे कर्ताधर्ता मंत्री धनंजय मुंडे, निष्पक्ष चौकशी होईल यात शंका आहे
By MahaTimes ऑनलाइन, बीड |
राजकीय भ्रष्टाचारावर मी अधिक लक्ष देतो. सर्वच प्रकरणे मी हातात घ्यायला काही भगवान नाही. जगमित्र कारखान्याचे कर्ताधर्ता मंत्री धनंजय मुंडे (dhananjay Munde) आहेत. ते दाखल एफआईआर इन्वेस्टीगेशन (FIR Investigation) होउ नये म्हणून प्रयत्नरत आहेत. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होईल यात शंका आहे. निष्पक्ष चौकशीसाठी काय प्रयत्न करणार हे स्पष्ट करावे. मी धमक्यांना घाबरत नाही, मला हाथ तर लावून दाखवावे असे खुले आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी केले.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत . दरम्यान त्यांनी बुधवारी जगमित्र कारखान्यात झालेल्या जमीन घोटाळ्यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एडी (Enforcement Directorate) कडे तक्रार (complaint) दाखल केली आहे. यापार्श्वभूमीवर ते गुरूवारी बीड जिल्हा दौºयावर आले आहेत.
बीडच्या दौºयाची सुरूवात धमक्यांनी होते. तत्पूर्वी त्यांना कथित स्वरूपात मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकाकरवी असभ्य भाषेत धमकी मिळाली आहे. अश्या ही स्थितीत किरीट सोमय्या धमकीला न जुमानता गुरूवारी बीड जिल्हा दौºयावर आले. आणि आपला नियोजित दौरा पूर्ण देखील केला.
दरम्यान त्यांनी अंबाजोगाईत पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत आमदार नमिता मुंदडा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, युवा नेते अक्षय मुंदडा आदि उपस्थित होते. ते म्हणाले की, मी किरीट सोमय्या सहित भाजपाच्या कोणत्याही नेत्याविरोधात तक्रार असेल तक आपण सत्तेत आहात त्याची चौकशी करावी. मी शेतकºयांना न्याय मिळवून देणारच असा त्यांनी ठाम निर्धार व्यक्त केला. यासाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
येथील एसपी मुंडेंचेच
मला काल दोन धमकीचे मॅसेज आले. मला झेड सुरक्षा असल्याने याची कल्पना एसपींना दिली तर त्यांनी स्थानिक लेवल ला तक्रार करा असे उध््दट उत्तर दिले. मी त्यांना माझी जिम्मेदारी होती म्हणून तुम्हाला कळविले. तुम्हाला अॅक्शन (Action) घ्यायची नसेल तर घेउ नका असे प्रतिउत्तर दिले. ही उ्ध्दव ठाकरेंची पोलिस आहे. येथील एसपी धनंजय मुंडेंचे असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी व पोलिसांनी स्वत:हून दखल घ्यायला पाहिजे होती. जर दखल घेतली नाही तर मी एसपींच्याविरोधात तक्रार करीन.