बीड शहरातील घटनेने खळबळ
By MahaTimes ऑनलाइन | Beed –
बीड शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात भरिदवसा झालेल्या हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अज्ञात तीन ते चार जणांनी शेख शाहीद शेख सत्तार (24) या तरु णावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील खासबाग परिसरात रहिवाशी शेख शाहिद शेख सत्तार यांचा बसस्थानकासमोरील बँकेसमोर सायंकाळी 4 वाजता अज्ञात कारणावरून वाद झाला. यादरम्यान त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करण्यात आले. ज्यात तो गंभीर जखमी होडन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यास तातडीने रु ग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तरु णाच्या हत्येचे वृत्त पसरताच शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हा रु ग्णालय परिसरात लोकांची गर्दी होत असल्याने खबरदारी म्हणून तेथे फौजफाट्यासह पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली होती. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्याची पुष्टी होऊ शकली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह ठाणे प्रभारी व कर्मचार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी आवारातील सीसीटीव्ही फुटेज आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्यास सुरूवात केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.