By MahaTimes ऑनलाइन | Beed –
मुझफ्फर खान चषक क्रिकेट स्पर्धा आज खासबाग ग्राउंड येथे संपन्न झाली गेल्या आठ दिवसापासून बीड येथे खासबाग ग्राउंड मध्ये क्रिकेट स्पर्धा चालू होती या स्पर्धामध्ये बीड जालना व जिल्ह्यातील विविध तालुक्यातील क्रिकेट टीम ने भाग घेतला होता ही स्पर्धा एम के ग्रुप चे आयोजक मकसूद खान लाला व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवली होती क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रवि सानप साहेब व समाजसेवक मुसाखान पठाण यांच्या हस्ते उद्घाटन झाला होता आज दिनांक 11-12-2021 रोजी संपन्न झाली.

या स्पर्धाचे मध्ये बीड इलेव्हन या टीमने प्रथम बक्षीस 21 हजार रुपये पटकावले आहेत तर M.K स्पोर्टस क्लब या क्रिकेट टीमने द्वितीय क्रमांक पटकावली आहे या स्पर्धाचे पारितोषिक व प्रथम क्रमांक यांच्या चेक देताना बीड चे आमदार संदीप भैया शीरसागर माजी आमदार सय्यद सलीम समाजसेवक मुसाखान पठाण एमके ग्रुपचे मकसूद लाला रमीज भाई अश्फाक इनामदार नगरसेवक जएअतुला खान समाजसेवक जावेद भैया कुरेशी भावी नगरसेवक सादिक भाई अंबानी यांच्या हस्ते देण्यात आला आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एम के ग्रुप चे शाहा जमा खान रमीस भाई आमिर खान सोहेल खान शद्धा खान व एम के ग्रुप चे आयोजक मकसूद लाला यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या फेटे बांधून सत्कार केला सूत्रसंचालन शहा जमा खान यांनी केले तर आभार शेख रमीस यांनी मानले.