इलियास इनामदार यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन | Beed –
लोकसेना संघटना राज्यभर शासनाविरोधात अल्पसंख्यांक थट्टा दिवस साजरा करणार नसता हिवाळी अधिवेशनात शासनाने वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या नसता हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यभर थट्टा दिन साजरा करण्यासह बेमुदत उपोषण करणार अशी चेतावणी इलियास इनामदार यांनी लोकसेना संघटना, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन व मुस्लिम समाजाच्या वतीने केली आहे.

मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण दिले नाही म्हणून, अल्पसंख्यांक संरक्षण कायदा बनवला नाही म्हणून, उर्दू बालवाड़यांना अंगणवाडीत रूपांतर केले नाही म्हणून, राज्यात एमपीएससी/यूपीएससी अभ्यासकेंद्र स्थापन केले नाही म्हणून, मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाचे बजट वाढ करुन थेट कर्ज योजना सुरु केली नाही म्हणून, वक्फ जमीनीवरील बेकायदेशीरपणे केलेली अतिक्रमणे काढ़ण्यात आली नाही व वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजानिक करण्यात आला नाही म्हणून, मुस्लिम युवकांना नौकरी व शिक्षणामध्ये संधी उपलब्ध करून न दिल्यामुळे, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती रक्कम मध्ये वाढ केली नाही व मेरिट ऐवजी कम्पल्सरी सर्व विद्यार्थीयांना देण्यात येत नसल्यामुळे, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक समिती स्थापन न केल्यामुळे, अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहाचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे, देशात व राज्यात अल्पसंख्याक समाजाला सर्वच क्षेत्रात दुय्यम वागणूक मिळत असल्या कारणाने थट्टा दिवस साजरा करणार असा इशारा लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी दिला आहे.
सविस्तर असे की 2 ऑक्टोबरला गाँधी जयंती दिनी लोकसेना संघटना, मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन व आरक्षण प्रेमीच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करुन वरील मागण्या करण्यात आल्या होत्या व सरकारला इशारा देण्यात आला होता की हिवाळी अधिवेशनापर्यंत मागण्या पूर्ण करावे नसता राज्यभर आंदोलन करण्यात येईल याच धरतीवर अठरा डिसेंबरला अल्पसंख्यांक हक्क दिवस असतो पण यादिनी लोकसेना संघटना राज्यभर शासनाविरोधात अल्पसंख्यांक थट्टा दिवस साजरा करणार नसता हिवाळी अधिवेशनात शासनाने वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. अशी मागणी लोकसेना संघटना प्रमुख इलियास इनामदार यांनी केली आहे.