By MahaTimes Online | Beed –
जिल्ह्यातील नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ साठी राज्य निवडणूक (State Election Commission) आयोगाने प्रत्यक्ष मतदान कार्यक्रम २४ डिसेंबर २०२१ रोजी जाहिर केलेला आहे. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचे निर्देशानुसार निवडणूकीसाठी मुख्य निवडणुक निरिक्षक व निवडणुक निरिक्षक यांना नियुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी दिले आहेत.
निवडणूक कार्यक्रम शांततेत, पारदर्शक, निष्पक्ष वातावरणात पार पडतील यासाठी मुख्य निवडणुक निरिक्षक व निवडणुक निरिक्षक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त निरिक्षक यांच्या दौऱ्याच्या दिनांकबाबत या जाहीर सुचनेद्वारे केज, आष्टी, पाटोदा, वडवणी व शिरुर कासार क्षेत्रातील नागरीकांना कळविण्यात आले आहे.

निवडणूक कार्यक्रम टप्प्यानुसार मुख्य निवडणुक निरिक्षक व निवडणुक निरिक्षक हे त्यांना नेमून दिलेल्या नगरपंचायत क्षेत्रात व कालावधीत उपलब्ध असणार आहेत.
मुख्य निवडणुक निरिक्षक व निवडणुक निरिक्षक यांचे नाव, पदनाव, संपर्क व कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे आहे-
आष्टी , पाटोदा व शिरुर कासार नगर पंचायत निवडणूकसाठी निवडणूक निरीक्षक (observer) म्हणून श्री. तुषार ठोंबरे अपर जिल्हधिकारी बीड हे असून त्यांचा दूरध्वनी क्रमांक (Telephone number) -०२४४२-२२२२७३ आणि ईमेल – addlcollectorbeed@gmail.com आहे.
वडवणी व केज नगर पंचायत निवडणूकसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती मंजुषा मिसकर, अपर जिल्हधिकारी, अंबाजोगाई असून त्यांचा दूरध्वनी क्रमांक -02446-244901 आणि ईमेल – acoamb@gmail.com आहे.
पाचही नगरपंचायत निवडणूक क्षेत्राचे मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून श्री. अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड हे असून त्यांचा दूरध्वनी क्रमांक -02442-222342 आणि ईमेल – ceozpbeed@rediffmail.com आहे.