आ.संदीप क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखालीअभिष्टचिंतन सोहळा व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
By महाtimes Online – देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बीडचे आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक व समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एक महिनाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

रविवार दिनांक. 12 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे खा. शरदचंद्रजी पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त व्हर्च्यल रॅली दाखवली जाणार असून गरजू दिव्यंगांना व्हिलचेअर व इतर साहित्याचेही वाटप केले जाणार आहे, यावेळी विविध मान्यवर संवाद साधणार आहेत. यावेळी दिव्यंगांना साहित्याचेही वाटप केले जाणार आहे. आ. संदीप भैय्या क्षीरसागर न यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने करण्यात आले आहे.