By महाtimes :- एमआयएम पक्षाच्यावतीने 11 डिसेंबरला मुंबईवर मुस्लिम आरक्षणासाठी तिरंगा रैलीचे आयोजन केलेले आहे. या तिरंगा रैलीला लोकसेना संघटना जाहिर पाठिंबा देत आहे असे प्रा. इलियास इनामदार यांनी जाहिर केले आहे.

मुस्लिम आरक्षण आंदोलन अनेक वर्षापासून सुरु आहे राज्यातील अनेक पक्ष-संघटना मुस्लिम आरक्षणासाठी लढा देत आहे राज्यात कोणीही आंदोलन करो मग ते शिवसंग्राम, वंचित बहुजन आघाडी, जमियत, कांग्रेस-राष्ट्रवादी, एम आय एम व इतर कोणीही असो लोकसेना संघटना मुस्लिम आरक्षण आंदोलनामध्ये आपल्या सोबत आहे व अकरा डिसेंबरला मुंबई येथे एम आय एमच्या वतीने होणार्या तिरंगा रैली मध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सामिल व्हावे असे आव्हान लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे.
इतर बातम्या: आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे बीड कनेक्शन, रैकेटचा पर्दाफाश!
Read More
1 thought on “‘एमआयएम’ च्या तिरंगा रैलीस लोकसेना संघटनेचा जाहिर पाठिंबा”