By महाtimes :- बीड येथील द्वारकाधीश मित्र मंडळाचे अध्यक्ष परशुराम गुरखुदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार ७ डिसेंबर रोजी एकाच दिवसात १२१ रक्तदात्यानी उस्फूर्तपणे रक्तदान केले. या वेळी नगर सेवक जगदीश गुरखुदे, परशुराम गुरखुदे, वैभव वैद्य, प्रशांत कुलकर्णी, अशोक नरवडे, बाबू काळवणे,बबलू शिंदे ,राधेशाम गुरखुदे, यांच्यासह बीड येथील द्वारकाधीश मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक दायित्व निभावण्याच्या उद्देशातून द्वारकाधीश मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येतात. मित्रमंडळाचे अध्यक्ष परशुराम गुरखुदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित रक्तदान शिबिरात १२१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी शहरातील नागरिक तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते व द्वारकाधीश मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.