By महाtimes :- दिव्यांग व्यक्तिंना अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अडचणींची दखल घेवून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी दिव्यांग व्यक्तिंना तालुकास्तरावर प्रमाणपत्र मिळावे यासाठी शासनाकडे केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग व्यक्तिंना आता तालुका स्तरावरच प्रमाणपत्र मिळणार आहे. दरम्यान यामुळे दिव्यांग व्यक्तिंना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्याकडून अमरसिंह पंडित यांचे आभार मानले जात आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढिदवसानिमित्त दि.22 जुलै रोजी संकल्प निरोगी बीड अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून अपंगांचे बोर्ड तालुका स्तरावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात एक दिवसाकरीता कार्यान्वित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक दिव्यांग्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले होते. दिव्यांग्यांना प्रत्येक महिन्यातून विशिष्ट तारखेला तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालयातच प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी यावेळी अमरसिंह पंडित यांनी केली होती.

दिव्यांग व्यक्तिंना जिल्हा रुग्णालयात येवून नोंदणी करताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत दिव्यांगांना अपंगाचे प्रमाणपत्र सहज आणि सुलभ पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी अपंगाचे बोर्ड महिन्यातून एकवेळेला उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रु ग्णालय येथे आयोजित करण्याच्या दृष्टीने अमरसिंह पंडित यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता यापुढे राज्यातील दिव्यांगांना अपंगाचे प्रमाणपत्र आता तालुकास्तरावरच मिळणार आहेत. तालुका स्तरावरच प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा मिळाल्यामुळे दिव्यांग व्यक्तिंना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.
इतर बातम्या: ‘एमआयएम’ च्या तिरंगा रैलीस लोकसेना संघटनेचा जाहिर पाठिंबा – Read More