दोन बडे अधिकारी, शिक्षक सह अनेकांना ठोकल्या बेड्या
By महाtimes बीड:- राज्यातील आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडल्या. दरम्यान आर्थिक गुन्हे व सायबर शाखेने विविध ठिकाणी छापेमारी केली असता या पेपरफुटीचे लोण बीड पर्यंत येऊन पोहचले. आरोग्य विभागाच्या पेपर फूटीप्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश करत लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकार्यासह पाचजणांना अटक केली. यात डॉक्टर, शिक्षक व आरोग्य कर्मचाºयासह 11 जणांना गजाआड केले आहे. या कारवाई ने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडिगरे (वय 50, रा. योगेश्वरी नगरी,अंबाजोगाई, जि.बीड), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (36, रा. एकात्मता कॉलनी, अंबाजोगाई, जि.बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (36, रा. तितरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के (38, रा. पंचशीलनगर, अंबाजोगाई, जि. बीड), भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचासहायक अधीक्षक राजेंद्र पांडुरंग सानप (रा.भक्ती कंस्ट्रक्शनशामनगर बीड) यांना अटक केली
आहे. यापूर्वी विजय मुन्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ या सहा जणांना गजाआड केले होते.
जिल्ह्यात आता पाच ठिकाणी दिव्यांग नोंदणी
Read More
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर पोलीस ठाण्यात आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता रविंद्र कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. तर तत्पुर्वीच राहुल प्रभाकर कवठेकर (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड) या स्पर्धा परिक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता
पुणे शहराच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखालील या प्रकरणाचा तपास पुणे आर्थिक गुन्हे आणि सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक डी. एस.हाके, उपनिरीक्षक अमोल वाघमारे आदींनी केला. या टीम ने संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत सुरु वातीला विजय प्रल्हाद मुन्हाडे (वय 29 रा.नांदी ता.अंबड), (अनिल दगडू गायकवाड (वय 31 रा.किनगाव वाडी ता.अंबड) यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. या दोघांच्या तपासातून हा पेपर आरोपी बबन बाजीराव मुंढे (वय 48 रा. पळसखेडा झाल्टा ता.देऊळगाव राजा) याने पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याच्या तांत्रिक तपासात हा पेपर सुरेश रमेश जगताप (रा.बोल्हेगाव ता.घनसावंगी) या क्लास चालकाने तीन परिक्षार्थींना हा पेपर वितरीत केल्याचे निष्पन्न झाले.
त्याला अटक केल्यानंतर आरोपीसंदीप शामराव भुतेकर (वय 38 रा.भाग्योदय नगर सातारा परिसर औरंगाबाद यास औरंगाबादेतून ताब्यात घेतले होते. दरम्यान तपासात प्रकाश दिगंबर मिसाळ (वय 40 रा. कामधेनू पार्क, वराळे ता.मावळ, व्यवसाय नेव्हल डॉकयार्डमध्ये खलाशी यांचे नाव समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या पेपरफुटी प्रकरणातील कथित मुख्य आरोपी तथा जिल्हा परिषद शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे (वय 36 रा. तिंतरवणी. ता.शिरूर बीड) याने दिलेल्या माहितीवरून 7 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्या तपासातून पेपर फुटीची खरी माहिती उघडकीस आणली.
आरोपीत यांचा समावेश
आरोपींमध्ये लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी, बीड येथील एक जिल्हा परिषद शिक्षक, अंबाजोगाईच्या मेंटल हॉस्पिटलचा वैद्यकीय अधिकारी, नेकनूर येथील रु ग्णालयाचा कर्मचारी आणि बीडमधीलच भक्ती
कंस्ट्रक्शनमध्ये राहणारा परंतु आता भूम येथे ग्रामीण रुग्णालयात सहायक अधीक्षक असलेल्याचा यात समावेश आहे.
1 thought on “आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे बीड कनेक्शन, रैकेटचा पर्दाफाश!”