By महाtimes बीड:- तालुक्यातील पोखरी येथील मनीषा शहाजी फाळके या विवाहितेला जिवंत जाळल्याप्रकरणी येथील न्यायालयाने पती व दिरास जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पती शहाजी आश्रुबा फाळके व दीर आश्रुबा फाळके (रा. पोखरी ता. बीड) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

सदर घटनेची माहिती अशी की, ही घटना वर्ष 2016 मध्ये घडली. मृत मनीषा फाळके हिचा विवाह घटनेच्या नऊ वर्षांपूर्वी बीड तालुक्यातील पोखरी येथील शहाजी आश्रुबा फाळके यांच्याशी झाला होता. दरम्यान दोघांना तीन मुली आहेत. मनीषाच्या सासºयाच्या नावे पाच एकर जमीन होती. सदरची जमीन वाटणी करून द्यावी. अशी मागणी मनिषा ने केली होती. मात्र घरच्यांचा याला विरोध होता. यावरून पती मनीषाला मारहाण करायचा तर सासू आणि दीर शेतात न येण्याबाबत धमक्या देत असत. 13 मे 2016 रोजी पहाटे चार वाजता मनीषा तिच्या खोलीत झोपली असता पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पती शहाजी ने मनिषाच्या अंगावर कँड मधील रॉकेल ओतले तर दीर बबन याने काडी पेटवून आग लावली. दरम्यान मनीषा ने मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा केल्यावर मंदिराच्या आवारात झोपलेले पाच-सहा जण धावत आले आणि अंगावर पाणी टाकून आग विझवली. इतरांनी तिला जिल्हा रु ग्णालयात दाखल केले.

सहायक सरकारी वकील, बीड.
दरम्यान, पोलिस व दंडाधिकाºयांनी मनिषाचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवला. त्यानुसार नेकनूर पोलिस ठाण्यात पती शहाजी, सासू सोजरबाई आणि दीर बबन यांच्याविरु द्ध कलम 307, 498अ, 506 सह कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहा दिवसानंतर 19 मे 2016 रोजी उपचारादरम्यान मनीषाचा मृत्यू झाला. त्यानंतर यात 302 कलम वाढवण्यात आले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय आर.बी.पाटील करून मा. न्यायालयात आरोप दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायालय-4 श्री. आर.एस.पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावे व साक्षीदारां जवाब या आधारे न्यायालयाने महिलेचा पती व दीरास कलम 302अन्वये दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली. तिसरी आरोपी सासू सोजरबाई हिच्या विरूध्द गुन्हा सिध्द न झाल्याने तिची निर्दोष मुक्तता केली.
सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. बी.एस. राख यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ मोहन मिसाळ यांनी सहकार्य केले.