जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांची माहिती
By महाtimes बीड:- राज्य सरकारने दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणीसाठी विशेष अभियान जाहीर केल्यानंतर 12 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाव्यतिरीक्त इतर पाच ठिकाणी दिव्यांग नोंदणी आणि प्रमापत्र दिले जाणार आहे .
माजलगाव , गेवराई , आष्टी , केज आणि परळी या पाच ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणीसाठी मेडिकल बोर्ड बसणार आहे . तर बीडच्या जिल्हा रुग्णालयातही बुधवारसोबतच शुक्रवारी देखील दिव्यागाचे मेडिकल बोर्ड बसणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी दिली.
या पाच ठिकाणी होणार दिव्यांग नोंदणी
सोमवार – ग्रामीण रुग्णालय माजलगाव , उपजिल्हा रुग्णालय केज
मंगळवार – उपजिल्हा रुग्णालय गेवराई
बुधवार – जिल्हा रुग्णालय , बीड
गुरुवार – ग्रामिण रुग्णालय , आष्टी
शुक्रवार – जिल्हा रुग्णालय बीड आणि उपजिल्हा रुग्णालय परळी
1 thought on “जिल्ह्यात आता पाच ठिकाणी दिव्यांग नोंदणी”