माजी मंत्र्यांना धक्का : वैजीनाथ तांदळेंसह पाच गावचे सरपंच, चेअरमन सह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By महाtimes न्यूज नेटवर्क:
आम्ही लोकांसमोर प्रामाणिक भूमिका घेवून जातोत म्हणूनच लोक विश्वास ठेवतात. यापुढे कुठल्याही निवडणूका असो झेंडा तर राष्ट्रवादी काँग्रेसचाच फडकणार. यापुढे मॅनेजमेंटचे राजकारण चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका राहिल. बीड नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असून निवडणूकीत दिलेल्या शब्दांची पुर्तता विकास कामाच्या माध्यमातून सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली.

शिवसेनेचे जिल्हा सचिव वैजीनाथ तांदळे यांच्यासह पाच गावचे सरपंच, चेअरमन, शेकडो कार्यकर्त्यांना सोमवार दि.6 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वैजीनाथ तांदळे यांच्या प्रवेशाने राजुरी सर्कल वन साईड झाले असून या प्रवेशाने माजी मंत्री आणि नगराध्यक्षांना चांगलाच धक्का बसला आहे. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, ज्येष्ठ नेते अॅड.डी.बी.बागल, आसाराम गायकवाड, बबनराव गवते, महादेव उबाळे, कल्याण आखाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, नाना मनाने चांगले आणि पक्के आहेत. या परिवाराचं प्रेम आण िविरोध दोन्ही पाहिलेला आहे. वंजारवाडी राजुरी पासून वेगळी नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आण िआशिर्वादामुळे मी आमदार होवू शकलो. यापुढे नानांसह प्रवेश करणार्? या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान आण िसंधी दिली जाईल.
कोण काय म्हणाले…

माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आ. संदिप क्षीरसागर सरळ आहेत. सर्वांना सोबत घेवून शहरी आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून बीड शहरातील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत. प्रवेश करणार्? या प्रत्येकाला संधी मिळेल आण िसन्मान होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
माजी आ.सुनिल धांडे म्हणाले की, आ.संदिप क्षीरसागर पवार साहेबांचे लाडगे आमदार आहेत. इमानदार कार्यकर्त्याला ते संधी देतील असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ रहा असे आवाहनही त्यांनी केले. आ.उषाताई दराडे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार्?या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी आण िसन्मान देत असतांना सर्व सामान्यांची कामे देखिल मोठ्या प्रमाणात होत आहेत. यापुढे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असे म्हटले आहे. ज्येष्ठ नेते अॅड.डी.बी.बागल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आण िताकद घराघरापर्यंत पोहचवा आण ियेणार्?या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहनही त्यांनी केले.
ये तो टेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं-वैजीनाथ नाना तांदळे
कार्यकर्त्यांचे उपकार मी विसरू शकणार नाही, प्रवेश करतांना आनंद होत आहे. माझ्या गावात दर दिवसाला पाणी देतो परंतू पाणी उपलब्ध असतांना बीड शहराला पंधरा दिवसाला पाणी मिळत आहे. बीड शहरात घाणीचे साम्राज्य असून ही राजकारणातील घाण साफ करायची आहे. स्व.काकूंना वंजारवाडीतून बिनविरोध ग्रा.पं.सदस्य ज्येष्ठ मंडळींनी दिल्यानंतर काकू राजुरीच्या सरपंच झाल्या. तेंव्हापासून क्षीरसागर कुटुंबाशी प्रेमाचे संबंध आहेत. मध्यंतरी काही गैरसमजातून दुरावा झाला, ज्यांच्याकडे गेलो त्यांनी मात्र विश्वासघात केला असे म्हणत त्यांनी माजी मंत्री व नगराध्यक्ष पिता-पुत्रावर कडाडून टीका केली. येणार्या काळात माङया बरोबर प्रवेश करणार्?या कार्यकर्त्याला सन्मान व संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उपस्थितांना आ.संदिप भैय्यांच्या पाठिशी ताकद उभी करा असे आवाहन केले. ये तो टेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं असे म्हणत येणार्?या काळात राष्ट्रवादीचेच दिवस असतील असेही त्यांनी म्हटले आहे
ही बातमी वाचा: अबब! एक कोटीचा गुटखा जब्त अमरावतीहून मुंबई कडे जातांना मुद्देमाल पकडला
1 thought on “आमची भूमिका प्रामाणिक म्हणूनच लोक विश्वास ठेवतात
-आ.संदिप क्षीरसागर”