(By महाtimes) बीड:- खासदार रजनीताई पाटील यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त बीड येथे गणेश बजगुडे पाटील यांच्या वतीने आज कंकालेश्र्वर मंदिर येथे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, युवा नेते आदित्य दादा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बीड तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने गणेश बजगुडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत “ऋग्नवाहिकेचे लोकार्पण” गोरगरीब कामगारांना धान्य वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मास्क स्यनिटायजर वाटप, कोविड लसीकरण शिबिर, इत्यादीसह बीडचे ग्रामदैवत खंडेश्र्वरी देवीच्या महाआरती कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
