By महाtimes न्यूज नेटवर्क | रईस खान

अमरावतीहून औरंगाबाद मार्गे मुंबई कडे जात असलेला आयशर टेम्पो पाठलाग करून पोलिसांनी पकडला. या कार्रवाईत एक कोटी रूपयाचा गुटखा व वाहन असा 1 कोटी 15 लाख रूपयाचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. ही कार्रवाई औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी दुपारी करण्यात आली.
माहिती अशी की, आज रविवारी (दि. 5) रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी औरंगाबाद ग्रामीण श्री. जयदत्त भवर यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमरावती येथुन औरंगाबाद मार्गे मुंबईकडे एक गुटख्याने (Tabacco) भरलेला आयशर गाडी (क्र एम एच 04 जेके 3615) ही जाणार आसल्याची माहिती मिळाल्याने त्यांचे अधिपत्याखालील पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, जमादार गणेश मुळे,पोलिस नाईक सुनिल गोरे, दिपक सुरोशे,पालिस अंमलदार आण्णा गावंडे, गणेश कांबळे यांनी पोलीस ठाणे करमाड हद्दीत रवाना होवुन सदरीच आयशर गाडी ही औरंगाबाद ग्रामीण हद्दीत प्रवेश करताच गाडीचा पाठलाग करु न रोडवरील वाहतुक व परीस्थिती पाहुन मौजे गोलटगाव फाटा येथे 13.30 वाजेच्या सुमारास आयशर गाडी आडवुन गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये नजर नावाच्या गुटख्याचे एकूण मोठे 83 बँग किंमत अंदाजे 1 कोटी 25 हजार रु पये व आयशर गाडी 15 लाख रूपए असा एकुण 1 कोटी 15 लाख 25 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री. निमीत गोयल साहेब, अपर पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सपोनि प्रशांत पाटील व कर्मचाºयांनी केली. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाई ने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.
2 thoughts on “अबब! एक कोटीचा गुटखा जब्त अमरावतीहून मुंबई कडे जातांना मुद्देमाल पकडला”